विभागाविषयी
रोजगार
स्वयं-रोजगार
सावित्री प्रतिष्ठान
मुख्य पान
कंपनी विभाग
नोंदणी करा
आपली गरज भरा
योग्य उमेदवार शोधा
उमेदवार विभाग
नोंदणी करा
योग्य नोकरी शोधा
My Account
महत्वाची संकेत स्थळे
 
 
 


Login
    Password
   

आमचा उपक्रम


दि. २७ व २८ फेब्रुवारी २०१० रोजी ठाणे शहर येथे आयोजित होणार्‍या रोजगार - स्वयंरोजगार मेळावा (झेप २०१०) तसेच सावित्री प्रतिष्ठान व रोजगार व स्वयंरोजगार विभागाच्या जिल्हा कार्यालयाचे माननीय राजसाहेब ठाकरे यांचे शुभहस्ते उदघाटन

महाराष्ट्र राज्यातील तरुण बेरोजगारांना नोकरी व व्यवसायीक संधी उपलब्ध करून त्यांना त्यांच्या पायावर उभे रहाण्यासाठी प्रयत्न करण्याचा सन्मा. राजसाहेबांनी सतत ध्यास घेतला आहे. आपल्याला कल्पना असेलच की राजसाहेबांचा हा प्रयत्न नवीन राजकीय पक्ष स्थापने पासूनचा नसून, गेल्या १४ वर्षांपासूनचा आहे आणि म्हणुनच अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. ह्याच उद्देशाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तरुणांना रोजगार किंवा स्वयंरोजगार संधी उपलब्ध करून देणेसाठी "रोजगार-स्वयंरोजगार" विभागाची स्थापना केली.

ह्याचेच एक पाऊल म्हणून "रोजगार-स्वयंरोजगार", विभागाने केंद्र सरकार, महाराष्ट्र सरकार, महानगरपालिका तसेच महामंड्ळे यांच्या अखत्यारीतील विविध व्यवसायांच्या योजना व संधी यांची माहिती, सुबकपणे संकलित करून मार्गदर्शिकेच्या रुपात या पुर्वी उपलब्ध करून दिलेली आहे.

समाजाच्या विविध थरातील सुशिक्षित तरुण, महिला व विशेषतः ग्रामीण भागातील लोकांपर्यंत ह्या योजना पोहोचणे गरजेचे आहे. त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करून आर्थिक विकास घडवण्यासाठी माननीय शालिनीताई ठाकरे यांच्या नेत्रेत्वाखाली सावित्री प्रतिष्ठानची दमदार वाटचाल सुरू आहे. मुंबई-ठाणे बरोबरच महाराष्ट्राच्या अन्य भागातही स्वस्त धान्य विक्री केंद्र, दूध वितरण, महिलांसाठी गृहउद्योग व महाराष्ट्रातील विविध भागातील कुटीरोद्योगातून निर्मित वस्तूंना बाजारपेठ मिळवून देण्याबरोबरच विविध सेवा उद्योगांची उपलब्धता क्रून देणेसाठी सावित्री प्रतिष्ठान प्रयत्नशील आहे.

ठाणे शहर व जिल्ह्यातील तरुण बेरोजगार व महिलांकरीता विषेशत्वाने रोजगार व स्वयंरोजगाराच्या सुसंधी प्राप्त व्हाव्यात या दृष्टीकोनातून विशेष लक्ष देऊन " रोजगार-स्वयंरोजगार " विभाग तसेच सावित्री प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक २७ व २८ फेब्रुवारी २०१० रोजी, सकाळी १० ते सायं. ७.३० वा. श्री मावळी मंडळाचे भव्य पटांगण, गणेश टॉकीज जवळ चरई, ठाणे (प) या ठीकाणी "झेप २०१०" या रोजगार व स्वयंरोजगार मेळाव्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. महाराष्ट्र शासन व केंद्र सरकारची महामंडळे व विविध अस्थापना व तसेच खाजगी क्षेत्रातील उद्योजकांशी संपर्क साधून त्याचेद्वारे या मेळाव्यात विविध कक्ष उभारण्यात येणार आहेत, ज्यातून या मेळाव्यास भेट देणार्‍या करीता माहिती तंत्रज्ञान, अत्याधुनीक व्यापारी संकुले, वाहन व्यवसाय, कृषी तंत्रज्ञान, पशुपालन तसेच सेवा उद्योग व वित्तिय संस्थांसोबत लघु व गृह उद्योग या क्षेत्रांमधील रोजगारांच्या तात्काळ सेवासंधी

तसेच स्वयंरोजगारासंबंधीचे मार्गदर्शन प्राप्त होणार आहे. त्याबरोबरच स्वयंरोजगार विभागाने ग्राहकोपयोगी विविध वस्तुंच्या विक्रीकरिता विशेषत्वाने अभ्यास करुन निर्मित केलेल्या एका बहुपयोगी वहानाचे अनावरण व सावित्री प्रतिष्ठान निर्मित ग्राहकोपयोगी विविध वस्तुंचे लोकार्पण होणार आहे.

राज साहेबांच्या राजकिय वाटचालीतील रोजगार व स्वयंरोजगार या विषयासंदर्भात त्यांनी विशेषत्वाने दिलेले लक्ष व मार्गदर्शन आमच्यासाठी प्रेरणादायी आहे व त्याचे भान ठेऊनच ठाणे जिल्ह्यात असणारी रोजगार व स्वयंरोजगार विषयक प्रत्येक सुसंधी आपल्या कार्यकर्त्यांपर्यंत तसेच सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. ज्यामध्ये उपरोल्लेखित बाबींव्यतीरिक्त विविध सहकारी संस्थांची स्थापना, खरेदी - विक्री संघ, बचत गटांच्या ग्राहकपेठा, अस्तंगत होत चाललेल्या आठवडे बाजाराचे पुर्नःस्थापन व स्वयंरोजगार विषयक प्रशिक्षण वर्ग आदी उपक्रमांचे गठन या नियोजनात समाविष्ट आहे. या चळवळीला व्यापक स्वरुप देण्याच्या दृष्टीकोनातुन ठाणे जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार विभाग तसेच सावित्री प्रतिष्ठानचे आधुनिक सुविधांनी सुसज्ज असे सुमारे १३५० चौरस फुट क्षेत्रफळाचे स्वयंपुर्ण कार्यालय याच सुमुहुर्तावर सन्मा. राजसाहेबांच्या शुभहस्ते कार्यान्वित करण्यात येत आहे. शांती पॅलेस बेसमेंट, आयडिबीआय बँकेशेजारी, वीर सावरकर मार्ग, चरई, ठाणे (प) याठिकाणी स्थापित होणार्‍या कार्यालयातुन ठाणे जिल्ह्यातील कार्यकर्ते व सर्वसामान्य जनतेसाठी सातत्याने उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

जागतिक मराठी भाषा दिन व कवी कुसुमाग्रजांच्या जयंतीदिनी संपन्न होणार्‍या या मेळाव्यास ठाणे जिल्ह्यातील नागरीकांनी भेट द्यावी व ह्या विभागाच्या मदतीने तरुणांनी व महिलांनी रोजगाराबरोबरच स्वयंरोजगाराची वाटचाल करुन छोट्या छोट्या व्यवसायातुन मोठे उदयोग उभारावेत व नवा महाराष्ट्र घडवावा असे आवाहन यानिमित्ताने आम्ही करीत आहोत.

शालिनी ठाकरे
उपाध्यक्षा : म.न.से., म.न.म.से.
अध्यक्षा : सावित्री प्रतिष्ठान

राजन गावंड
ठाणे जिल्हा चिटणीस व प्रवक्ता
सरचिटणीस - रोजगार व स्वयंरोजगार
महाराष्ट्र प्रदेश

 
 © www.manaserojgar.org     Best viewed in 1024 X 768. Developed by Unity Infotech